पर्यावरणशास्त्र, पर्यावरणशिक्षण व पर्यावरणजागृती यावर लिहिलेली अनेक पुस्तके आज वाचकाला व अभ्यासकाला सहजपणे उपलब्ध आहेत. या सर्वच पुस्तकातून पर्यावरणाचा प्रामुख्याने जागतिक पातळीवर विचार केलेला दिसून येतो.
पर्यावरणाचा स्थानिक पातळीवरचा विचार अनेक वेळा जास्त महत्त्वाचा व उपयुक्त असतो. आपल्या आजूबाजूच्या परिसराचे महत्त्व कळणे व आपल्याच ढवळाढवळीमुळे त्या परिसराचा कसा र्हास होत आहे ते समजणे ही आता गरजेची गोष्ट बनू लागली आहे. पर्यावरणाचे हे महत्त्व लक्षात घेऊन, शाळा, महाविद्यालये व विद्यापीठ पातळीवर सक्तीचे पर्यावरण शिक्षण राबविण्यात येऊ लागले आहे.
ॠर्वसामान्य व्यक्तीला आणि अभ्यासकाला पर्यावरणाच्या मुख्य समस्या समजाव्यात, पर्यावरणर्हास म्हणजे काय व तो कसा ओळखावा हे कळावे व त्यासाठी कशाप्रकारचे प्रयत्न चालू आहेत याचीही थोडीफार कल्पना यावी यादृष्टीने या पुस्तकातील लेखांची रचना केलेली आहे.