डॉक्टर - पेशंट नात्याचा वेध घणारे ललित पुस्तक
आजच्या काळात ‘फॅमिली डॉक्टर’ ही संकल्पना लोप पावत चालली आहे. डॉक्टर ‘निदान’ करण्याच्या फंदात न पडता छोट्या मोठ्या आजारांसाठीही भारंभार तपासण्या करण्यास भाग पाडताना दिसतात. रुग्णांची आर्थिक पिळवणूक करणारे डॉक्टर्स जसे समाजात आहेत, तसे देवासारखे धावून येणारे डॉक्टरही आहेत.
डॉक्टर आणि रुग्ण यांचं नातं विविधरंगी असतं. त्यात दु:ख, वैफल्य, वेदना, आनंद, खंबीरपणा, आशा आणि निराशा या भावनांचं इंद्रधनुष्य प्रकट होत असतं. रुग्णांची मानसिकता, त्यांचं अज्ञान, दुर्लक्ष करण्याची वृत्ती, रुग्णांच्या या सर्व गोष्टींना सांभाळून घेणारा डॉक्टर या पुस्तकातून भेटतो.
आजच्या धावपळीच्या आणि यांत्रिक बनलेल्या जीवनक्रमात डॉक्टर आणि रुग्णांचं हृदयस्पर्शी नातं उलगडत जाणारे हे प्रत्यक्ष घडलेले किस्से वाचकांना अंतर्मुख करतील.