
ज्याच्याकडे प्रज्ञेसोबत शील आहे तो विद्येच्या बळावर स्वतःबरोबर इतरांचीही उन्नती करील. प्रज्ञा, शील व करुणा यांचा समावेश ज्याच्या व्यक्तिमत्त्वात आहे, असा जबाबदार नागरिक घडवणे हे शिक्षणाचे कार्य आहे. जागतिक-भारतीय अनेक शिक्षणतज्ज्ञांनी यासाठी अनेक नवेनवे मार्ग आणि प्रयत्न केले आहेत. या शिक्षण तज्ज्ञांच्या योगदानाची ओळख करून देणे हेच पुस्तकाचे उद्दिष्ट आहे.