
बदलत्या काळानुसार मराठी विषयाच्या अध्ययन, अध्यापनाच्या कक्षाही रुंदावत आहेत. त्यास अनुसरून व्यावहारिक, उपयोजित मराठीसह प्रसारमाध्यमांचे महत्त्वही दिवसेंदिवस अधिक अधोरेखित होत आहे. जागतिकीकरणाच्या आजच्या युगामध्ये भाषा हे एकमेव असे साधन आहे की, जिच्या माध्यमातून जग अधिकाधिक जवळ येण्याची प्रक्रिया झपाट्याने सुरू झाली आहे. त्या अनुषंगाने साहित्यिक मराठीसह व्यावहारिक आणि उपयोजित मराठीचा दैनंदिन कामकाजातील वापर अधिक गतिमान आणि प्रभावी होण्यासाठी हे पुस्तक विद्यार्थी आणि अध्यापकांना प्रेरणादायी व दिशादर्शक ठरेल, याची खात्री वाटते.
प्रसारमाध्यमांच्या कार्यपद्धतीविषयीचे काही लेख याच अनुषंगाने या पुस्तकात समाविष्ट केले गेले आहेत. त्यांचाही उपयोग अभ्यासकांना होईलच. पुणे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाशी निगडित असलेल्या या पुस्तकामुळे विद्यार्थी आणि भाषा-अध्यापकांना एकत्रित स्वरूपाचे हे पुस्तक म्हणजे पर्वणीच ठरेल !