या कोशाचा अभ्यास अनेक पद्धतींनी करता येऊ शकेल. कोशातील विविध क्षेत्रांतील लोकांचे, वस्तूंचे, व्यवहाराचे आणि परंपरांचे निदर्शक असे जे शब्द आलेलेे आहेत ते शिवकालीन महाराष्ट्राच्या सामाजिक व राजकीय जीवनावर कितीतरी प्रकाश पाडून जातात.
या कोशात १६७८ मध्ये रूढ असलेल्या दक्षिणी उर्दूतील १००० हून अधिक शब्द आलेले आहेत. या दृष्टीने शिवाजीमहाराज हे उर्दू भाषेचे पहिले कोशकार ठरतातच, पण उर्दू- संस्कृत या एकमेव कोशाचे प्रेरक ठरतात हे लक्षात घेतले पाहिजे.
अभ्यासकांना ही मोठी पर्वणीच आहे.