राजकीय संकल्पना आणि सिद्धान्त हा विषय महाविद्यालय आणि विद्यापीठ स्तरावर शिकवल्या जाणाऱ्या राज्यशास्त्र या विषयाचा एक महत्वाचा अभ्यासभाग आहे. प्रस्तुत ग्रंथात अनेक महत्त्वाच्या राजकीय संकल्पनांचा, सिद्धांतांचा व विचारप्रणालींचा सखोल उहापोह करण्यात आला आहे. या संदर्भात, राज्यशास्त्र या विषयाचे मुळातून आकलन होण्याच्या दृष्टीने सदर मुद्दे अभ्यासाने अत्यंत आवश्यक ठरते. त्यासाठी हा संदर्भग्रंथ मोलाचे मार्गदर्शन करतो.
राज्यशास्त्राचे अभ्यासक, प्राध्यापक, राज्यशास्त्राचे पदवी, पदव्युत्तर विद्यार्थी, वृत्त पत्रकार तसेच स्पर्धा परीक्षार्थी यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त ग्रंथ !