रामचंद्रपंत आमात्यांचा ‘आज्ञापत्र’ अथवा शिवकालीन ‘राजनीति’ हा ग्रंथ मराठ्यांच्या इतिहासाचे एक अव्वल साधन म्हणून मानला जातो. या आज्ञापत्राचे वर्णन करताना ‘ऐतिहासिक वाङ्मयातील ‘अमूल्य रत्न’ (म. म. द. वा. पोतदार), ‘प्राचीन ऐतिहासिक वाङ्मयात असा दुसरा सर्वांगसुंदर ग्रंथ क्वचितच आढळेल’ (प्रा. वि. भि. कोलते), ‘मराठी वाङ्मयाचा अमूल्य आणि अपूर्व अलंकार’ असे उद्गार काढले आहेत. शिवकालीन राज्यकारभाराच्या तसेच मध्ययुगीन मराठी भाषेच्या अभ्यासासाठी हा ग्रंथ मौलिक स्वरूपाचा आहे.
प्राध्यापक अ. रा. कुलकर्णी संपादित प्रस्तुत आवृत्तीचे एक वैशिष्ट्य म्हणजे, यात सर्वमान्य आज्ञापत्राची मोडी संहिता मूळ स्वरूपात मोडी लिपीत दिली असून त्याचे ओळीबरहुकूम मराठी लिप्यंतर आणि राज्यशास्त्राचे प्राध्यापक श्री. व्यं. पुणतांबेकर यांनी केलेले इंग्रजी भाषांतर येथे एकत्रित दिले आहे.