राजकीय सिद्धान्त, राजकीय संस्था आणि प्रक्रिया, आंतरराष्ट्रीय राजकारण आणि लोकप्रशासन या राज्यशास्त्राच्या उपअभ्यास क्षेत्रांचे विश्लेषण करणारे ‘समकालीन राज्यशास्त्र’ हे मराठीतील पहिलेच पुस्तक आहे. उपअभ्यास क्षेत्रांचे स्वरूप, व्याप्ती, अभ्यासाची तंत्रे आणि क्षमता यांचे तपशीलवार विवेचन या पुस्तकात केले गेले आहे. समकालीन दशकातील ‘राज्यशास्त्र’ या विषयातील नवे धुमारे या पुस्तकात आले आहेत. राजकीय अर्थकारण, निवडणूक अभ्यासशास्त्र (झीशहिेश्रेसू), राजकीय इतिहास, सामाजिक चळवळी, सार्वजनिक धोरण व राजकीय भूगोल या उपअभ्यास क्षेत्रांतील फेरबदलांचा समावेशही या पुस्तकात केला गेला आहे. हे पुस्तक विद्यार्थी आणि संशोधकांसाठी अभ्यासाच्या नव्य