समतानंद अनंत हरी गद्रे
समतानंद अनंत हरी गद्रे
  • Load image into Gallery viewer, समतानंद अनंत हरी गद्रे
  • Load image into Gallery viewer, समतानंद अनंत हरी गद्रे

समतानंद अनंत हरी गद्रे

Regular price
Rs. 225.00
Sale price
Rs. 225.00
Regular price
Rs. 275.00
Sold out
Unit price
per 

जातिभेद व अस्पृश्यता हे दोन मोठे शाप आपल्या देशाला मिळाले आहेत. त्याचे समूळ निराकरण करण्याकरिता संत, विचारवंत, समाजसुधारक यांनी आपले जीवन समर्पित केले. यामध्ये सध्याच्या काळात विस्मरणात गेलेले एक नाव म्हणजे समतानंद उर्फ अनंत हरी गद्रे. ऑक्टोबर १८९० मध्ये जन्म व १९६७ मधे मृत्यू असा त्यांचा जीवनप्रवास.

याप्रवासामध्ये, त्यांच्या शब्दात सांगायचे तर, त्यांनी अनेक ’भानगडी’ केल्या. टिळकांच्या दौर्यातील भाषणांचे शब्दांकन करणारे वृत्तपत्रकार, ’मौज’ व ’निर्भीड’ साप्ताहिकांचे संस्थापक व संपादक आणि सरतेशेवटी अस्पृश्यतानिवारणाचे काम निष्ठेने करणारे समाजसुधारक. सत्यनारायणाच्या पूजेच्या वेळी गोरगरिबांना परवडणारा झुणकाभाकरीचा प्रसाद वाटणे आणि विशेष म्हणजे पूजेला बसलेल्या हरिजन दांपत्याचे चरणतीर्थ पप्राशन करणे हा त्यांच्या अस्पृश्यतानिवारण चळवळीतील परमोच्च बिंदू!

असे हे बहुपेडी, बहुआयामी व्यक्तिमत्त्व त्यांच्या कार्याची दखल, आठवण व नोंद, ही कायमस्वरूपी राहावी म्हणून हा चरित्र लेखनाचा प्रपंच.