इ. स.च्या पाहिल्या शतकापासून विसाव्या शतकापर्यंत झालेले संस्कृत सुभाषितांचे संग्रह आपण पाहिले, पण त्यातून सुभाषितांसंबंधी शास्त्रपूत चर्चा झालेली नाही, हेही आपल्या ध्यानी आले. मराठी संत सुभाषितांच्या निमित्ताने आपल्याला ही चर्चा या ग्रंथात मिळेल. सुभाषित म्हणजे काय ? सुभाषितांचे निकष कोणते? यांचा उहापोह इथे केला आहे. सुभाषितांवर गद्य-पद्य असे बंधन असते का? सुभाषित आणि म्हणी यांचे नाते काणते? यासारख्या प्रश्नांची चर्चा इथे आढळेल.
या चर्चेच्या अनुरोधाने मराठी संत सुभाषितांचा अनोखा संग्रह इथे प्रथमच केला आहे. या संग्रहात ५००० पेक्षा अधिक सुभाषिते आहेत. अभ्यासकांच्या सोयीसाठी त्यांचे ११५ विषयांमध्ये वर्गीकरण केले आहे. त्यातून संतांचा जीवनहेतू स्पष्ट होतो. संतांना समाजाच्या मनाची मशागत करायची आहे, हे स्वच्छ दिसून येते. यादवकाळापासून पेशवाईपर्यंतच्या काळात झालेल्या या संतांनी एकच विचार सांगितला आहे. हे त्यांचे साम्यसूत्र आहे.
यातील एकेक विषयाची सुभाषिते म्हणजे एकेक विषयाचे एकत्रित केलेले संदर्भ आहेत. अभ्यासकांना आणि सर्व जिज्ञासूंना याचा भरपूर उपयोग होईल असा विश्वास वाटतो. या सुभाषितांमधील विषयांवर सहज नजर टाकली तरी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासाचे मूलध