सार्वजनिक आयव्ययाचे स्वरूप बदलत असले तरी त्याचे महत्त्व वाढताना दिसून येते. सार्वजनिक आयव्ययाची उत्क्रांती कशी झाली, त्यात बदल कसे झाले याबरोबरच, महत्तम सामाजिक लाभ तत्त्वाला सध्या सरकारांनी कल्याणकारी राज्याची भूमिका स्वीकारल्याने महत्त्व प्राप्त झाले आहे, त्याच्या विश्लेषणाबरोबरच खर्च, सार्वजनिक उत्पन्न, कर, इ. बाबत सरकारच्या दृष्टिकोनावर चर्चा केलेली आहे. प्रस्तुत पुस्तकात याबरोबरच सार्वजनिक कर्ज, राजकोषीय धोरण, अंदाजपत्रक, तुटीचा अर्थभरणा, स्थानिक स्वराज्य संस्थांचा आयव्यय, आर्थिक विकास व वित्त, केंद्र-राज्य वित्तीय संबंध इ. प्रमुख घटकांविषयी या संदर्भग्रंथात चर्चा केलेली आहे.
अर्थशास्त्राचा पदवी व पदव्युत्तर विद्यार्थी वर्ग, अभ्यासक, प्राध्यापक, केंद्र व राज्य सरकारे, स्पर्धा परीक्षा या सर्वांनाच उपयुक्त असा संदर्भग्रंथ निश्चित उपयोगी ठरेल.