‘शाश्वत विकास’ हा सध्याचा महत्त्वाचा विषय आहे. या विषयाची जागतिक स्तरावर दखल घेतलेली आहे. शाश्वत विकासावर जर वेळीच उपाययोजना केली नाही तर पुढच्या पिढ्यांना त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. शाश्वत विकासात आर्थिक विकास आणि पर्यावरण यांचा योग्य मेळ घालावा लागेल त्या दृष्टीने सदरील पुस्तकात विविध पैलूंवर प्रकाशझोत टाकलेला आहे. सध्या वाढते प्रदूषण, जागतिक हवामान बदल, लोकसंख्या वाढ व पर्यावरणाच्या र्हासामुळे शाश्वत विकासाला महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यासाठी शाश्वत विकास उगम व विकास, शाश्वत विकासाबाबत भारतातील योजना, करार, शाश्वत विकास ध्येय, प्रगती, अंमलबजावणी, आव्हाने, नवीन दृष्टिकोन, साध्य व आव्हाने इत्यादींबाबत सदरील पुस्तकात विवेचन केलेले आहे. स्पर्धा परीक्षा, पर्यावरण अभ्यासक, विद्यार्थी, संशोधक, बी.ए., एम.ए., कॉमर्स राज्य व स्थानिक शासने इत्यादींसाठी उपयुक्त पुस्तक.