र्हाईनबाक धबधब्यावरून शेरलॉक कोसळल्यावर असं वाटत होतं, जणू या जगातून तो नाहीसा झाला..जितक्या रहस्यमयरीत्या तो गायब झाला तितक्याच रहस्यमयरीत्या तो तीन वर्षांनी परत आलाय. अनेक थरारक कामगिर्या त्याची आणि त्याचा साथीदार वॉटसनची वाट बघतायत; पण आता होम्सचा सामना त्याच्या सर्वांत क्रूर प्रतिस्पर्ध्याशी आहे : चार्ल्स ऑगस्टस मिल्वर्टन.
जगभरातल्या सगळ्या वाचकांचं सर्वांत लाडकं काल्पनिक पात्र, म्हणजे शेरलॉक होम्स! सर आर्थर कॉनन डॉयल यांनी कथा-जिवंत केलेला हा भन्नाट डिटेक्टिव्ह केवळ असामान्य बुद्धी आणि तर्काच्या जोरावर चक्रावून टाकणार्या रहस्यांचा उलगडा करतो.
या संग्रहात अशाच रोमांचक रहस्यकथांमधून तो आपल्याला भेटणार आहे आणि आणखीच चक्रावून टाकणार आहे.