शिक्षण : विचारमंथन

शिक्षण : विचारमंथन

Regular price
Rs. 180.00
Sale price
Rs. 180.00
Regular price
Rs. 200.00
Sold out
Unit price
per 

सामान्यपणे; माझा शिक्षणविषयक अभ्यास व त्यावरील विचार जस जसा पुढे जातो, तसतसा तो मी लेखरूपाने व नंतर ग्रंथरूपाने वाचकांसमोर ठेवीत आलो आहे.
या पुस्तकातील शिक्षणविषयक विचारमंथन मात्र, वेळोवेळी, माझ्या व इतरांच्या ग्रंथांना प्रस्तावना लिहिण्याच्या निमित्ताने झाले आहे.
मी अशा प्रकारे लिहिलेल्या काही निवडक प्रस्तावना येथे एकत्रित केल्या आहेत. आपल्याकडील मुलामुलींचे शिक्षण ज्या व्यापक अशा तात्त्विक आणि व्यावहारिक परिस्थितीत होत आहे, त्या परिस्थितीचे अवलोकन, विश्लेषण आणि विवेचन या प्रस्तावनांमधून त्या त्या वेळी मांडले असल्यामुळे त्यांचे एकरूप चित्र वाचकांसमोर उभे रहावे या हेतूने हा पुस्तकप्रपंच केला आहे.
अशा प्रकारचे, भूतकाळ व वर्तमानकाळ यांमधील विचारांचे विश्लेषण, भविष्यकाळ रेखताना उपयुक्त ठरते, असा माझा कयास आहे.