मराठ्यांच्या इतिहासामध्ये
अनेक कर्तृत्ववान स्त्रिया होऊन गेल्या.
या स्त्रियांनी कधी प्रत्यक्ष तर कधी पडद्यामागे राहून आपली तेजस्वी प्रतिमा राज्यकारभारात उमटवली.
शिवछत्रपतींच्या यशस्वी कारकिर्दीमध्ये
जसा मातोश्री जिजाऊंचा सहभाग होता
तसाच पत्नी सईबाईंचा सुद्धा होता.
या ऐतिहासिक ललित वाङ्मयामध्ये शिवाजीमहाराज आणि सईबाई यांचे राजकीय तसेच व्यक्तिगत भावजीवन लेखकाने चित्रित केले आहे.
‘प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते’ या आधुनिक म्हणीकरिता हा ऐतिहासिक पुरावाच ठरेल.