स्वीस चित्रकार, शिल्पकार, कलाइतिहास तज्ज्ञ आणि भारतविद्येच्या केवळ शुष्क अभ्यासक नव्हे; तर भारताबद्दल अंतरात जिव्हाळा बाळगणाऱ्या ॲलिस बोनर यांचे हे चरित्र. अतिशय संपन्न घरात जन्मलेल्या ॲलिस सदैव नैसर्गिक, साध्या जीवन शैलीच्या आणि चिरंतनाच्या शोधात राहिल्या. भारताबद्दलच्या ओढीने त्या इथे आल्या. त्यांनी पर्यटकाच्या नजरेने भारत पाहिला नाही; तर भारताच्या आत्म्याचा धांडोळा घेतला. थोडी थोडकी नाही तर त्रेचाळीस वर्षे त्या वाराणसीत राहिल्या. रमल्या. भारतीय देवता, शिल्पाकृती आणि मंदिरे हे त्यांचे उत्कट आवडीचे विषय होते. मंदिर स्थापत्यकलेवर देखील त्यांनी लिखाण केले. देश-विदेशात भ्रमण करून भारतीय शिल्पकलेची बलस्थाने त्या आग्रहाने मांडत राहिल्या. १९७४ मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले. त्या म्हणतात की, ""सूक्ष्म, तरल, सारगर्भ संवेदनांचा, कलांचा केवढा अनमोल वारसा भारतीय लोकांच्या रक्तात वारसाहक्काने वाहतो आहे बरं. त्यांचं मूल्य भारतीय लोकांना कधी खऱ्या अर्थाने जाणवेल?""
अशा या विलक्षण विदुषीची चरित्रगाथा वाचकाला ही समृद्ध करेल अशी आशा वाटते.
अशा या विलक्षण विदुषीची चरित्रगाथा वाचकाला ही समृद्ध करेल अशी आशा वाटते.