Strivaadi Samajik Vichaar
Strivaadi Samajik Vichaar
  • Load image into Gallery viewer, Strivaadi Samajik Vichaar
  • Load image into Gallery viewer, Strivaadi Samajik Vichaar

स्त्रीवादी सामाजिक विचार

Regular price
Rs. 440.00
Sale price
Rs. 440.00
Regular price
Rs. 550.00
Sold out
Unit price
per 

पाश्‍चिमात्य जगातील स्त्रीवादी विचारांचा परिचय करून देणारे हे पुस्तक, आजघडीला जेव्हा आपण जागतिकीकरणाचा रेटा आणि धार्मिक मूलतत्ववाद अनुभवतो आहोत, त्यासंदर्भात महत्त्वाचे वाटते. आज स्त्रीवादाला हिरीरीने पाश्‍चिमात्य ठरवून फेकून देऊन संकुचित संस्कृतीनिष्ठ चौकटीत स्त्री-प्रश्‍न मांडला जातो आहे. अशावेळी चिकित्सक स्त्रीवाद विकसित व्हायचा तर आपण स्त्रीवादाचा अभ्यास जागतिक इतिहासाच्या संदर्भात करणे महत्त्वाचे आहे.

पाश्‍चात्य जगातील स्त्रीवादाची पायाभरणी करणार्‍या या पुस्तकातील सहा विचारवंतांनी आपल्या काळातील सामाजिक-राजकीय प्रश्‍नांमध्ये रस घेऊन, कृती करून, आपला विचार मांडला. आज आपण जे स्त्रीवादी सिद्धांतन करू पाहतो आहोत, अथवा राजकीय परिवर्तन आणू पाहतो आहोत, त्याचा पाया निर्माण करणार्‍या ह्या विचारांचा अभ्यास म्हणूनच महत्त्वाचा ठरतो.