सूक्ष्म आर्थिक विश्लेषणात लहान घटकांच्या वर्तनाचा अभ्यास केला जातो. ऍडम स्मिथ यांनी सूक्ष्म आर्थिक विश्लेषणाची सुरुवात केली. डॉ. मार्शल यांनी या अभ्यासाला पूर्णरूप मिळवून दिले आणि ऑस्ट्रियन व नव-सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांनी त्यात नव-नवीन सिद्धान्त मांडले. प्रस्तुत पुस्तकात पारंपरिक आणि आधुनिक दृष्टिकोनातून सूक्ष्म आर्थिक विश्लेषण मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आर्थिक प्रश्न, बाजारयंत्रणा, उपभोक्त्यांचे सिद्धान्त, उत्पादन सिद्धान्त, पुरवठा वक्र, समतोल तसेच बाजार, मक्तेदारी, स्पर्धा, पर्यायी सिद्धान्त, विभाजन व कल्याणकारी सिद्धान्त इ. प्रमुख घटकांविषयी या संदर्भग्रंथात चर्चा केली आहे.
अर्थशास्त्राचा पदवी व पदव्युत्तर विद्यार्थीवर्ग, अभ्यासक, संशोधक, प्राध्यापक या सर्वांनाच उपयुक्त हा संदर्भग्रंथ निश्चित उपयुक्त ठरेल.