"‘स्वभावाला औषध नाही’ हे आपल्या मनावर इतके बिंबवले गेले आहे
की, स्वत:त बदल करण्याच्या प्रयत्नांबद्दलही आपण साशंक होऊ लागतो.
मग त्या विषयीची तंत्रे, प्रशिक्षण किंवा त्यातील यशाचे दाखलेही थापाच वाटू लागतात, आणि तरीही प्रत्येकाला कधी ना कधी, कोणाच्या ना कोणाच्या बाबतीत, स्वभावाला औषध शोधण्याची गरज वाटलेली असते, यात शंका नाही. ही गरज लक्षात घेऊनच या पुस्तकाची योजना आखली आहे.
मानवी जीवन सर्वस्वी ताणमुक्त होणार नाही, हे मान्य केले की, आपले
ध्येयही ‘ताण कमी करणे’ अशा चढण्याजोग्या पायरीवर येते आणि त्यातूनही जे ताण उरतील, अपरिहार्य असतील ते पेलण्याची ताकद कमावणे हाही उद्देश या प्रयत्नाच्या पाठीशी उभा राहतो. या पुस्तकातील विवेचन अंतिम किंवा परिपूर्ण नाही, हे मान्यच आहे. परंतु आधुनिक मनोविज्ञानाच्या मार्गाने प्राप्त झालेली तंत्रे वापरून बघण्यासाठी उपलब्ध व्हावीत, यासाठी हा प्रयत्न आहे.
यामुळे, हे पुस्तक वाचत असताना जागोजाग थबकून आपल्या अनुभवाशी
ताळा घेत राहणे महत्त्वाचे आहे. शांत निरीक्षणाने काय दिसते, काय लक्षात येते, यावरच स्वभावासाठीचे औषध सिद्ध होणार असते. आपण जसे आपल्या हाताने पायावर धोंडा पाडून घेऊ शकतो, त्याचप्रमाणे आपण स्वत:शी संवादही करू शकतो. हे पुस्तक अशा संवादाचा निश्चित आरंभ करून देईल!
Written Renowned Psychologists, Sudheer and shyamala Vanarase, the book helps the reader access his own personality and helps him/her make positive changes in their life through scientific methods. It helps th ereader in reducing stress and anxiety and also develop better relationships. "