उत्तम मोडी अक्षराइतके सुंदर लिहिणे नाहीच म्हटलं तरी चालेल. ही लिपी आपल्या महाराष्ट्रात गेल्या सहा-सातशे वर्षे चालू आहे व तिने मराठी भाषा बालबोधीपेक्षा किती तरी जलद लिहिता येते. मोडी बालबोधीपेक्षा वाचण्यास कठीण असा तिजवर आक्षेप घेतला जातो पण निष्काळजीपणे लिहिलेलं बाळबोध अक्षरही तितकेच दुर्वाच्य होते असा अनुभव आहे.