‘टीव्हीच्यापडद्यामागील विश्व’ हे पुस्तक म्हणजे टीव्हीच्यापडद्यामागचं रचनात्मक, प्रक्रियात्मक आणि संशोधनात्मक पैलू उलगडून दाखवण्याचा प्रयत्न आहे. पाश्चिमात्य आणि विकसित देशांमध्ये इतर सर्व समाजमाध्यमांप्रमाणेचटीव्ही या माध्यमाचाही अनेक अंगानी विचार आणि अभ्यास केला गेला. भारतात टीव्ही या विषयावर गांभीर्यपूर्ण आणि अभ्यासपूर्ण लेखन अभावानेच वाचायला मिळते. टीव्हीबद्दलचेबहुतांश लेखन हे इंग्रजी भाषेतच उपलब्ध आहे. मराठी वाचकांना विशेषत: संज्ञापन आणि पत्रकारितेचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना टीव्ही या विषयाची ओळख व्हावी हा या पुस्तकाचा मूळ हेतू आहे. टीव्हीवरील कार्यक्रमांची रचना, त्यांची निर्मिती प्रक्रिया, या प्रक्रियांशी संबंधित तांत्रिक बाबी या सगळ्या मुद्दयांचा या पुस्तकात समावेश आहेच शिवाय टीव्हीशी संबंधित संशोधनावरही स्वतंत्र प्रकरणांचा समावेश आहे. त्यामुळे या विषयात संशोधन करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे पुस्तक दिशादर्शक ठरेल.