संवाद, शेर-शायरी, हिंदी काव्य, विविध हिंदी वाङ्मयप्रकार एवढेच काय आपल्या मराठी या मातृभाषेतही अनेक उर्दू शब्द आपण ऐकत असतो, वापरत असतो.
त्या शब्दांच्या अर्थाअभावी आपण त्यांचा आनंद घेऊ शकत नाही. पण या शब्दांचा अर्थ समजला तर या वाङमयप्रकारांचा आनंद द्विगुणित होईल. या शब्दकोशामध्ये उर्दूतील सुमारे २००० शब्दांचा मराठी व इंग्रजी अर्थासह समावेश केला आहे. प्रत्येक उर्दू भाषाप्रेमी, विद्यार्थी, शिक्षक, ग्रंथप्रेमी, जिज्ञासूंकडे असायलाच हवा. आपला उर्दू शब्दसंग्रह ‘समृद्ध’ करा!