Uttam Adhyapanachi rahasye

उत्तम अध्यापनाची रह्स्य

Regular price
Rs. 250.00
Sale price
Rs. 250.00
Regular price
Rs. 300.00
Sold out
Unit price
per 

आजचे अडखळणारे मराठी पाऊल पुढे पडायचे असेल तर महाराष्ट्रात परीक्षांचा नव्हे - तर विद्येचा सुकाळु व्हायला हवा.

दिशा हरवलेल्या शैक्षणिक धोरणातून सुटका होण्याची वाट बघत न बसता पालक-शिक्षकांनी संगनमत करून शिकवण्याचा आणि म्हणून शिकण्याचा दर्जा सुधारण्याच्या मागे लागले पाहिजे. ( खास करून उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात.)

मराठी माणसाची आणि भारतीयांची सतत चिंता करणार्‍या

डॉ. अशोक केळकरांच्या हाती, एके काळी त्यांच्यापाशी शिकलेल्या डॉक्टर श्रीमती विनय किरपालांनी आपण संपादित केलेले पुस्तक

Secrets of Good Teaching

अभिप्रायासाठी आणून दिले. मानव्यविद्या, विज्ञान, तंत्रज्ञान, वाणिज्य अशा विविध विषयांतल्या गुणी प्राध्यापकांनी आपआपल्या लेखात (तात्त्चिक आदर्शांच्या मोघम भाषेत गप्पा न मारता) थेट अनुभवाचे बोल ऐकवले आहेत. हे पुस्तक वाचणार्‍या प्राध्यापकांना आणि त्यांच्या सहायकांनाही आपल्या कामात सहज वापरून पाहता येतील, अशा युक्त्या इथे उघड केल्या आहेत. त्यांना नवीन तांत्रिक सुविधादेखील डोळसपणे वापरता येतील. थोडक्यात, एकच एक रहस्य नव्हे तर अनेक गुपिते म्हणजेच

उत्तम अध्यापनाची रहस्ये

प्राध्यापकांत कळकळ तर हवीच, पण ती जागरुक, उपक्रमशील, विवेकी कळकळ हवी. डॉ. केळकरांनी आपल्या देखरेखीखाली हा मराठी अनुवाद करवून घेतला आहे.