हल्ल्यात उडाले लोक | करिति शोक |
पडूनी संग्रामीं | नव लाख बांगडी फुटली वसई मुक्कामीं || - प्रभाकर शाहीर.
मराठेशाहीच्या इतिहासातील एका अभिमानास्पद, परंतु अज्ञात प्रसंगाचा इतिहास या पुस्तकात मांडला आहे. चिमाजीअप्पाच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी पराक्रमाची शर्थ केली, सर्वोच्च बलिदान दिलं आणि फिरंग्यांवर मात करून वसईवर स्वराज्याचा झेंडा फडकावला. त्याच वसईच्या मोहिमेचे तपशीलवार इतिहासकथन साक्षेपी अभ्यासक य. न. केळकर यांनी या पुस्तकात केले आहे.