विविध प्रकारच्या स्पर्धापरीक्षांमध्ये इतिहास या विषयाचा समावेश आहे. कुठल्याही स्पर्धापरीक्षेकरिता विषयाचा खोलवर अभ्यास जसा महत्त्वाचा असतो, तेवढेच महत्त्व सरावालादेखील आहे. ह्याच विचाराने सेट,नेट व केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या ‘वैकल्पिक इतिहास’ या परीक्षांचा अभ्यासक्रम डोळ्यांसमोर ठेवून विद्यार्थ्यांना परीक्षेचा सराव करता यावा, यासाठी ह्या पुस्तकाची रचना करण्यात आलेली आहे. प्रश्नांचे वर्गीकरण करून दिलेले असल्यामुळे कुठल्या प्रकारचे प्रश्न अवघड जातात, हे समजण्यास देखील हे पुस्तक विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरेल.