आधुनिक काळ हा ‘मार्केटिंगचा जमाना’ म्हणून ओळखला जातो. विक्री, सेवा, सल्ला, विमा यासारख्या अनेक क्षेत्रांमध्ये विपणन हे अपरिहार्य ठरले आहे. महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठात बी. कॉम., एम. कॉम.,
बी. बी. ए. इत्यादी अभ्यासक्रमांमध्ये या विषयाचा अंतर्भाव करण्यात आला आहे.
विपणन हे शास्त्र आणि कला दोन्ही आहे. या तत्त्वानुसार उपरोक्त अभ्यासक्रमांकरिता उपयुक्त अशी या संदर्भग्रंथाची रचना करण्यात आली आहे. क्रमिक अभ्यासक्रमाप्रमाणेच व्यावहारिक तंत्र आणि मंत्र यांची ओळख करून दिली आहे. पुस्तकामध्ये संदर्भग्रंथसूची, संज्ञासूची, प्रश्नसंच यांचा अंतर्भाव करण्यात आला आहे.
‘जो बोलेल त्याची माती विकली जाईल, न बोलेल त्याचं सोनंही विकलं जाणार नाही’ या पारंपरिक म्हणीनुसार प्रत्येक विद्यार्थी हा ज्ञान आणि व्यवहार या दोन्हीची सांगड घालून यशस्वी आणि प्रयोगशील ‘विपणन व्यवस्थापक’ होण्याकरिता हा संदर्भ ग्रंथ उपयुक्त आहे.
एवढेच नव्हे तर ‘मार्केटिंग’ क्षेत्रात काम करणार्या व करू इच्छिणार्या सर्वांनाच हा ग्रंथ मार्गदर्शक ठरेल.