भारताला आजमितीला भेदणाऱ्या प्रमुख आर्थिक समस्या कोणत्या आहेत? त्यामागची आर्थिक, सामाजिक व राजकीय करणे कोणती? राजकीय चौकटीत निर्णय कसे घेतले जातात? राजकीय व्यूहरचनांचा आर्थिक धोरणांवर नक्की कसा प्रभाव पडत असतो? भारताला आर्थिक महासत्ता बनविण्यासाठी भारताची राजकीय चौकट व आर्थिक धोरणे अनुकूल आहेत का? अशा अनेक प्रश्नांना भिडणारे अर्थशास्त्रीय लघुनिबंध ‘वित्तार्थ’ ह्या पुस्तकात वाचावयास मिळतात.
“डॉ. रूपा रेगे नित्सुरे यांचे हे अर्थविषयक लेख म्हणजे एका क्लिष्ट विषयाच्या अनेक पैलूंचे अत्यंत रसाळ शैलीत केलेले अभ्यासपूर्ण विवेचन आहे.”
श्री. य. मो. देवस्थळी, अध्यक्ष, एल. अॅड. टी. फायनान्स होल्डिंग्ज व माजी प्रमुख वित्तीय अधिकारी, एल. अॅड. टी. लिमिटेड.
“डॉ. रूपा रेगे नित्सुरे ह्यांचे विवरण व समीक्षा ही अर्थशास्त्रातील मूलभूत सिद्धांतांच्या आधारावर केलेली असल्यामुळे एक-दोन वर्षांपूर्वी लिहीलेल्या या लेखांचे ताजेपण कमी झालेले नाही. हा लेखसंग्रह अर्थशास्त्राशी संबंधित सर्व अभ्यासकांना उपयुक्त ठरेल असा विश्वास वाटतो.”
श्री. शरद काळे, अध्यक्ष, एशिअॅटिक सोसायटी व भूतपूर्व आयुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिका.
“सर्वसामान्य वाचकांना आर्थिक बाबींची पार्श्वभूमी तसेच सूक्ष्मभेद समजावून देण्याचे काम एखाद्या कार्यकुशल अर्थतज्ञाने करणे गरजेचे असते. माझ्या मते, डॉ रूपा रेगे नित्सुरे ह्यांनी हे काम अतिशय गौरवास्पद पद्धतीने पार पाडले आहे.”
डॉ. नीळकंठ रथ, ज्येष्ठ अर्थतज्ञ व भूतपूर्व संचालक, गोखले अर्थशास्त्र संस्था, पुणे.
“अर्थशास्त्राचे सखोल ज्ञान असलेली व्यक्तीच इतक्या सहजतेने आणि स्पष्टपणे अर्थशास्त्रातल्या कठीण गोष्टींची मांडणी करू शकते आणि रूपाकडे हे दोन्ही गुण आहेत. प्रत्येक सुजाण नागरिकाने हे पुस्तक वाचायलाच हवे.”
श्री. निरंजन राजाध्यक्ष, ज्येष्ठ अर्थतज्ञ व मिंट वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक.