एक चांगली व्यक्ती बनणं हे जर आपण आपलं उद्दिष्ट मानलं तर आपलं वर्तन प्रभावी बनवल्याशिवाय ते साध्य होऊ शकणार नाही; जर आपण आपलं वर्तन प्रभावी बनवू शकलो तर त्यातून साकारणारं व्यक्तिमत्त्व प्रभावी म्हणूनच संबोधलं जाईल. अर्थात, ‘वर्तनातून साकारणारं व्यक्तिमत्त्व ‘प्रभावी’ बनण्यासाठी काय करावं?’ हाच या पुस्तकाचा विषय आहे.