आजच्या जागतिकीकरणाच्या युगामध्ये स्पर्धात्मक वाटचालीत गुणवत्तेला पर्याय नाही. महाविद्यालयीन पातळीवर पदवी व पदव्युत्तर स्तरावर मराठीचे अध्ययन-अध्यापन करताना वाङ्मयीन मराठीबरोबरच व्यावहारिक व उपयोजित मराठीचे शास्त्रीय दृष्टिकोनातून अध्ययन करणे काळाची गरज बनली आहे.
याशिवाय २१व्या शतकातील गतिमान युगामध्ये विविध माध्यमांचे महत्त्वही अधोरेखित होते. याच भूमिकेतून प्रस्तुत संशोधन व समीक्षा ग्रंथातून तज्ज्ञ व अभ्यासू लेखकांनी केलेले लेखन स्पर्धात्मक युगात सर्वांनाच दिशादर्शक ठरेल याची खात्री वाटते. असंख्य वाचक, विद्यार्थी आणि अध्यापकांना हा ग्रंथ म्हणजे आगळीवेगळी पर्वणीच ठरेल.