संदेशवहन ही एक महत्त्वाची गरज आहे. संदेशवहनात दोन व्यक्ती अथवा अधिक व्यक्तींमध्ये कल्पना, विचार, मते आणि भावना यांची देवाघेवाण होत असते. याच बाबींचा व्यवसायात वापर केल्यास त्याला व्यावसायिक संदेशवहन/संज्ञापन म्हणतात.
मानवी शरीरात रक्ताच्या प्रसारणास जितके महत्त्व आहे, तितकेच महत्त्व संदेशवहनाला व्यापार व व्यवसायात आहे. जोपर्यंत व्यवसाय अस्तित्वात आहे, तोपर्यंत संदेशवहनाची प्रक्रिया सतत चालू राहील.
या विषयाचे हे महत्त्व लक्षात घेऊन हे पुस्तक प्रयत्नपूर्वक तयार केले आहे. संदेशवहनाच्या विविध घटकांची येथे विस्ताराने चर्चा केली आहे.
संदेशवहनाचे अर्थ व स्वरूप, उद्दिष्टे, प्रकार, संदेशवहनाच्या पद्धती, माध्यमे, येणारे अडथळे याचे विस्तृत विवेचन आहेच. तसेच मुलाखती, समूह संदेशवहन, जनसंपर्क, अहवाललेखन, बाह्य संदेशवहन, सारांशलेखन याचीही स्वतंत्र प्रकरणे आहेत. सर्व प्रकारच्या पत्रव्यवहाराचा बारकाईने तपशील येथे दिलेला आहे.
या विषयाच्या सखोल अभ्यासासाठी व्यावसायिक संज्ञापन हे पुस्तक अत्यंत उपयुक्त ठरेल यात शंका नाही.