एकदाका उद्योजक बनायचेच असे ठरविले की, नेमका कोणता उद्योग सुरू करावा, कोणत्या प्रमाणात करावा, व्यवसाय संधी कशी शोधायची, इ. प्रश्न त्याला पडतात. ह्या प्रश्नांची उत्तरे ह्या पुस्तकात मिळतील. बँक अथवा वित्तीय संस्थेला व्यवसाय योजना सादर करावी लागते, त्याबद्दल सविस्तर मार्गदर्शन वाचकाला मिळेल. लघुउद्योग व्यवस्थापन कसे करावे याची चर्चा करण्यात आली आहे. सृजनशीलता आणि नवनिर्मिती ह्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर पुस्तकात प्रकाश टाकण्यात आला आहे. उद्योगातील समस्या आणि आजारपण यावर विस्तृत विश्लेषण केलेले आहे. संघटनात्मक वर्तनासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यावर पुस्तकात चर्चा करण्यात आली आहे.
तांत्रिक बाबींव्यतिरिक्त उद्योजकाला कर्मचार्यांचे वर्तन आणि व्यक्तिमत्त्व यांचीही जाण असली पाहिजे, त्याचाही उल्लेख पुस्तकात आहे. उद्योजकांची प्रेरणादायी संक्षिप्त चरित्रे पुस्तकात दिलेली आहेत. उद्योगात सांघिक कार्याला महत्त्व असते, त्याचीही चर्चा पुस्तकात केलेली आहे. विविध ताणतणाव आणि संघर्ष उद्योगात उद्भवतात. त्याबाबत सविस्तर माहिती व मार्गदर्शन वाचकाला मिळेल. संघटनात्मक बदल आणि विकास यांसारख्या महत्त्वाच्या विषयाला पुस्तकात न्याय देण्यात आला आहे.