सध्याचे युग हे तीव्र स्पर्धेचे आहे. जागतिकीकरणामुळे निर्माण झालेली आव्हाने समर्थपणे पेलून यशोशिखराकडे झेप घेण्याचे सामर्थ्य प्रत्येकामध्ये विकसित व्हावे, ही काळाची गरज बनली आहे. उज्ज्वल भवितव्य घडविण्याची मनात आस असलेल्या शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी एक दिशादर्शक व प्रेरणादायी मार्गदर्शन ‘झेप यशोशिखराकडे!’ या ग्रंथरूपाने सादर होत आहे.
या ग्रंथामध्ये विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाला परिपूर्ण आकार प्राप्त व्हावा व त्यांचा यशोशिखराकडे झेप घेण्याचा मार्ग सुसह्य व्हावा, यादृष्टीने निवडक व अत्यंत उपयुक्त असे एकूण ३५ लेख समाविष्ट केले आहेत. या लेखांमध्ये अनेक समर्पक उदाहरणे व टिप्स् दिलेल्या आहेत. त्यामुळे यशोशिखर गाठण्यासाठी व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू विकसित करण्यात हा ग्रंथ निश्चितच उपयुक्त ठरेल.
हा ग्रंथ आपल्यातील आत्मभान जागृत करून, प्रेरणेच्या वर्षावाने उत्तुंग यशोशिखराकडे झेप घेण्याचा आपला मार्ग सुकर करील.