आईनस्टाईनच्या मेंदूत असं होतं तरी काय!
‘आपल्यामध्ये असामान्य असं काही नाही; आपल्या मनात फक्त खूप कुतूहल आहे,’ असं आईनस्टाईननं स्वतःच तर सांगून ठेवलं होतं; पण तरीही अल्बर्ट आईनस्टाईन म्हणजे जगासाठी कायम एक कोडंच होऊन राहिला. खरोखरच कोण होता अल्बर्ट आईनस्टाईन? आपल्या अफाट कल्पनेच्या बळावर सृष्टीची रहस्यं शोधणारा वैज्ञानिक? अवकाश आणि काळ यांची चादर विणणारा कलाकार? ‘युद्ध नको’ म्हणून हिरिरीनं प्रयत्न करणारा शांततावादी? की नाझींना अणुबॉंब सापडण्याच्या भीतीनं हतबल झालेला ज्येष्ठ शास्त्रज्ञ? टाइम्स मासिकानं तर ‘अवघ्या विसाव्या शतकावर प्रभाव टाकणारा माणूस’ म्हणून आईनस्टाईनचा गौरव केला; पण खरं सांगायचं तर ‘निसर्गाच्या भव्य आणि अद्भुत पसाऱ्याकडे आश्चर्यानं पाहणारं लहान मूल’ हीच आपली ओळख त्याला सर्वाधिक प्रिय असावी. अगदी लहान असताना मोझार्टच्या सुरांमध्ये, युक्लिडच्या भूमितीमध्ये, फिजिक्सच्या अदृश्य नियमांमध्ये त्याला विश्वाच्या एकतानतेचं दर्शन घडलं होतं. ‘निसर्गातल्या भव्यतेमध्ये दडलेल्या आणि त्याच्या सूक्ष्माहूनही सूक्ष्म व्यवहारांमध्ये दडलेल्या दिव्यत्वाचा अनुभव घेणं हीच सर्वात सुंदर गोष्ट आहे,’ असं त्याचं म्हणणं होतं. याच अद्भुत गोष्टींचा शोध घेण्यासाठी त्यानं आपलं संपूर्ण आयुष्य खर्च केलं. अवघं विेश्व एका गणिती सूत्रात बांधण्याची आस त्यानं अखेरपर्यंत मनात सतत जपली. त्यानं पाहिलेलं हे ‘भव्यदिव्य स्वप्न’ आणि ‘अपार कुतूहलानं भारलेलं मन’ हाच त्यानं आपल्यासाठी मागे ठेवलेला सर्वांत मोठा वारसा आहे.
*माणसाला येऊ शकणारा सर्वांत महान अनुभव हा गूढतेचा आहे. खरी कला आणि खरं विज्ञान यांच्या मुळाशी असलेली हीच मूलभूत भावना आहे. ज्याला हे कळत नाही आणि सृष्टीतल्या गूढाच्या दर्शनानं ज्याचं मन भारावून जात नाही असा माणसू जिवंत आहे असं कसं म्हणावं? अशा माणसाची अंतज्योत विझून गेली आहे, त्याचे डोळे मिटलेले आहेत.*
या भन्नाट प्रतिभावंताचं भन्नाट चरित्र. अवश्य वाचा :
अल्बर्ट आईनस्टाईन : काळाचं रहस्य भेदणारा कालातीत प्रतिभावंत
चैताली भोगले
पुस्तक विकत घेण्यासाठी क्लिक करा -
https://dpbooks.in/products/albert-einstein